जळगाव, प्रतिनिधी । कोरोना काळात घरातील व्यक्ती गमावलेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र लाभ देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु असल्याबाबत निवेदन लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना व परिवारातील स्री अथवा पुरुष गमावलेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र लाभ देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्याबाबत तसेच महाराष्ट्र सरकारने कोरोना एकल महिलांना अनेक योजनांचा लाभ देण्याचा उदा. निराधार पेशनं, बालक पालक योजना, हक्काचे रेशन, उद्योग सुरू करायला अर्थार्जन, मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार, बचत गटाच्या माध्यमातून लाभ असे असताना तालुका स्तरीय वात्सल्य समितींच्या माध्यमातून काम पुढे सरकत नाही, म्हणून जिल्हा स्तरीय टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जळगाव यांना स्वतः कोरोनात एकल झालेल्या महिला व लोक संघर्ष मोर्चा चे कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ह्यावेळी सदर प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. यावेळी प्रतिभा शिंदे, रत्ना महाजन, जयश्री कहाने, लता कापडणे, सादाना सोनवणे, आरती संकट, सविता पाटील, भरत कर्डिले आदी उपस्थित होते.