जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील खर्चना गावी शेतीशाळा व शेतकरी दिन साजरा करण्यात आला.
जामनेर तालुका कृषी विभागातर्फे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा अंतर्गत शेती शाळा व शेतकरी दिन निमित्त महिला शेतकरी तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांची शेतीशाळा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार गणेश पांढरे ग्रामपंचायत सदस्य योगेश भडांगे प्रकाश पाटील किरण खैरनार पोलीस पाटील सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जामनेर तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक महाजन आत्मा समन्वयक राकेश पाटील कृषी सहाय्यक गायकवाड किशोर पाटील पी पी पवार सचिन सानप रुपेश बिराडे आदी कृषी अधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांना कपाशी मका केळी ज्वारी हरभरा गहू या पिकासंदर्भात पीक व्यवस्थापनाच्या संदर्भात पाण्याचे व्यवस्थापन कीटकनाशके खते पेरणी या संदर्भात सखोल माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी महिला शेतकरी कुसुम पाटील अर्चना पाटील सुनिता पाटील वैशाली पाटील सुनंदा पाटील शेतकरी अनिल पाटील साहेबराव पाटील भगवान पाटील सचिन पाटील नरेश पाटील चक्रधर पाटील सुभाष पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते