अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणी काझीसह मुलगा व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल

0
61

यावल ः प्रतिनिधी
गेल्या पाच महिन्यापूर्वी येथील बोरावल गेट परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी विवाह लावणार्‍या काझीसह इतरांविरूद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की यावल शहरातील बोरावल गेट परिसरातील रहिवासी राजु पटेल, जरीना राजु पटेल, रा.कंडारी पोस्ट साकरे ता. धरणगाव आणि विवाह लावणारे हाजी समद पटेल रा.बोरावल गेट तसेच शाहरूख राजु पटेल. मुलाचे वडील व आई नांव माहीत नाही या सर्वांनी मिळुन अल्पवयीन आरजु पटेल हिचा विवाह (निकाह) मुस्लीम धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे लावून दिल्याचे उघडकीस आल्याचे जिल्हा बालसंरक्षण सचिव तथा जिल्हा महीला व बालविकास अधिकारी विजयसिंग ई.परदेशी यांच्याकडील कार्यालयास प्राप्त पत्रासोबत जोडलेल्या पत्रांचे अवलोकन करता व या घटनेतील पिडीत अल्पवयीन आरजु शाहरूख पटेल वय १५ वर्ष ३ महीने असून,तिचा जबाब चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजीत सावळे यांनी १९ डिसेंबर रोजी यावल येथील शाहरूख राजु पटेल यांचा जबाब नोंदविल्याने हे निष्पन्न झाले.
आरजु शाहरूख पटेल ही अल्पवयीन असतांना तिचे वडील राजु पटेल व आई जरीना राजु पटेल यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे पोट कलम १ व ३ अन्वये अर्चना राजेन्द्र आटोळे (वय४०) यावल बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी यावल पोलीसात तक्रार दाखल दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here