मुंबई, वृत्तसंस्था । सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याबाबतचे सर्व निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
