मलकापूर : प्रतिनिधी येथे नाफेड जिल्हा पनण महासंघ. तसेच पृथाशक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड अहमदनगर यांच्या संयुक्त मका खरेदीची सुरुवात डाॅ.अरविंद कोलते मुख्यप्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर अँड. साहेबराव मोरे जेष्ठ नेते काँग्रेस कमीटी याच्या हस्ते शेतकरी बाळुभाऊ जाधव यांचा शाल व श्रीफळ देवुन खरेदी करण्यात आले.
भरड धान्याचे दुसरे सेंटर सुरु झाल्याने मलकापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मका. ज्वारी. बाजरी .तुर .हरभरा (चना) उडीद .मुग .सोयाबीन हमीभावात विकने सोईचे झाले असे मत डाॅ.अरविंद कोलते यांनी मांडले. तालुक्यातील शेतकर्यांना शेतमाल विकणे सोईचे व्हावेत यासाठी आमदार राजेशजी एकडे यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे असे काँग्रेस चे जेष्ठ नेते अँड. साहेबराव मोरे यांनी मत व्यक्त केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडुभाऊ चौधरी,बाळु पाटील, प्रल्हादराव ढोले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर प्रविण पाटील, भक्तीराज फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या संचालिका जयश्री प्रविण क्षिरसागर,राजकन्या पाटील,एस. पी.संबारे सर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड संभाजीराव गायकवाड उल्हासराव संबारे, लक्ष्मण कोलते, रवी भोलनकर व बहुसंख्य शेतकरीवर्ग उपस्थित होते.