मलकापूर :प्रतिनिधी येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल खालच्या पातळीवर शिवीगाळ करून टिका केली याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा मलकापूर यांच्या वतीने तहसील चौकात नाना पटोले यांचा पुतळा जाळण्यात आला आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नाना येशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष शुभम बोबडे, अमोल टप, दुर्गेशभाऊ राजापुरे,अजय नांदुरकर, युवा मोर्चा SC सेल जिल्हा उपाध्यक्ष कुणाल ढोलकर, रवि भाऊ वानखेडे , आशिष जुनाडे,देवेन टाक,अतुल जाधव,सागर बेलोकार, साहेबराव खराटे, स्वप्नील पाटील ,गोलू मापारी, रोशन करांगळे, अमर वैद्य, आकाश सातव ,दिनेश तायडे, प्रशांत दाते, स्वप्निल पोलाखरे, सागर पठ्ठे, इत्यादी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.