नेरी येथील वाघूर नदीवरील नव्या पुलाचे काम रखडले

0
42
जामनेर (प्रतिनिधी): – जळगाव मार्गावरील नेरी येथील वाघूर नदीवरील नवीन पुल सुरू होण्याची प्रतीक्षा होत असताना या पुलाचे काम सहा महिन्यांपासून किरकोळ बाबींसाठी रखडले आहे सध्या वापरात असलेल्या जुन्या पुलाची अवस्था बिकट झाली असून त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते.तसेच नवीन पुलाच्या अपूर्ण कामामुळे ही नागरिकासह वाहनचालकांच्या त्रासात भर पडली आहे त्यामुळे रखडलेले काम लवकर पूर्ण करून नवीन पुल सुरू करावा अशी मागणी होत आहे
नेरी येथील वाघूर नदीवरील नवीन पुलाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे.रस्त्यावर निर्माण होणाऱ्या धुळीमुळे पायी जाणाऱ्या व्यक्ती दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेले व्यवसायिक दुकानदार ग्रामस्थ यांना रोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने त्यासाठी अवजड वाहनांची ये – जा रोज सुरू असते त्यांच्या वाहतुकीमुळे जुन्या पुलाची अवस्था बिकट झाली आहे ठिकठिकाणी खड्डे पडले असून अनेकदा त्यात दुचाकीचे टायर गेल्यामुळे छोटे  – मोठे अपघातही घडले आहेत.तर म्हसावद चौफुलीवरील काम अपूर्णावस्थेत आहे मध्यभागी विविध फुलझाडे लावण्यासाठी जागा असून त्यासह प्रवासी बस स्टॅंटचेही काम पूर्ण झालेले नाही प्रवासी बस आल्यानंतर सोयीनुसार उभ्या राहतात परंतु अन्य वाहनांच्या वर्दळीमुळे अपघात होत असतात.तरी संबंधित ठेकेदाराने या कामाकडे त्वरित लक्ष देऊन व काम पूर्णत्वास नेवून सदर पुल वाहतुकीसाठी त्वरीत मोकळा करावा अशी मागणी वाहनचालकासह ग्रामस्थांकडून केली जात आहे
@ जुन्या पुलाचे रेलिंग तुटले  ; अपघाताचा धोका
वाघूर नदीवरील जुन्या पुलाचे रेलिंग ही तुटलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे रेलिंगची तत्काळ दुरुस्ती करून वाहनचालकांस पादचारी नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here