जळगाव : प्रतिनिधी
माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय जळगाव आयोजित कोविड १९ लोककल्याणकारी योजनांचे पथनाट्य कार्यक्रम विलास बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून जिल्ह्याभरात विविध संस्थांच्या माध्यमातून प्रारंभ करण्यात आला.
समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बु. यांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा बस स्थानकावर पथनाट्य सादर करुन जनजागृतीची सुरुवात केली.त्याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मधुकर जुलाल ठाकूर आरोग्य सेवक ,भाईदास बन्सी महानुभाव, बाबुलाल मुकूंदा पाटील, अशोक हिंमत पवार, मिलिंद अहिरे, प्रवीण अहिरे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.पथनाट्यचे प्रमुख योगेश लांबोळे, भावेश पाटील, संजना तायडे ,जयेश सोनवणे, कृष्णा बारी ,विशाल सदावर्ते, तेजस कोठावदे, महेश कोळी, अक्षय पाटील आणि विशाल जाधव यांनी प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.