जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एकुलती येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष अरुण पाटील यांनी आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या राजगड निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी शिवबंधन धागा बांधून भगवा रुमाल टाकून शिवसेनेत सत्कार केला याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील मुकेश जाधव अभिषेक पाटील शुभम वारके आदी मान्यवर उपस्थित होते संतोष पाटील यांचे शिवसेनेत प्रवेश केला म्हणून विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना प्रवक्ता गणेशराव पांढरे संजय तायडे उपतालुकाप्रमुख अशोक जाधव सुकलाल बारी जामनेर शहर प्रमुख अतुल सोनवणे शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर आदींनी अभिनंदन केले आहे