विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी मतदान होणार असून एक हजार ७०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे तहसीलदार रमेश जसवंत यांचे पथक मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत यासाठी २८ कर्मचारी मतदान प्रक्रिया साठी काम करतील नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी झालेल्या मतदानानंतर मंगळवारी उर्वरित चार जागांसाठी मतदान करण्यात येत आहे यानंतर बुधवारी मतमोजणी करण्यात येणार आहे वर्षभरापासून तीन वेळा प्रशासकांच्या ताब्यात गेलेल्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांना संधी देण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आलेली आहे त्यामुळे मंगळवारी चार जागांसाठीच्या बारा उमेदवारांचे आणि पहिल्या टप्प्यातील १३ जागांसाठी च्या ४० अशा ५२ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे मंगळवारी होणाऱ्या चार जागांमध्ये प्रभाग क्रमांक १ व २ आणि प्रभाग १४ आणि १६ या चार प्रभागांचा समावेश असून यासाठी तब्बल एक हजार ७०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे यामध्ये सर्वात कमी मतदान असलेल्या प्रभाग क्र. १४ साठी २३८मतदार असून त्यासाठी काट्याची तिरंगी लढत रंगली आहे त्यामुळे हा प्रभाग सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेचा केला असून साठीही भाजप-शिवसेना यांच्या चांगली लढत रंगली आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही तगडे आव्हान उभे करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रभाग दोनची लढतही काट्याची होणार आहे