सोयगाव तालुक्यातील रुग्णांत कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत:डॉ. पवार

0
10
सोयगाव-प्रतिनिधी 
जरंडी च्या कोविड केंद्रात उपचारासाठी असलेले कोरोना बाधित रुग्ण गंभीर लक्षणांची नाहीत या रुग्णांना खोकला सर्दी आणि ताप अशी लक्षणे नसून केवळ घशातील खवखव हाच प्रकार उपचारादरम्यान आढळून आला आहे त्यामुळे तिस-या लाटेची सोयगाव करांनी चिंता करू नये अशी माहिती कोविड वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियदर्शनी पवार यांनी दिली
 जरंडी च्या एकमेव तालुक्याच्या कोविड केंद्रात डॉ. प्रियदर्शनी पवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी रुग्णावर उपचार करत असून या रुग्णांना पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले तालुक्याची रुग्ण संख्या १५ वर गेली असता त्यातील एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे उर्वरित १४ रुग्णांपैकी अकरा रुग्ण होमआयसोलेशन मध्ये असून कोविड वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार या होमआयसोलेशन रुग्णांच्या ही उपचाराचा आढावा घेत आहेत त्यामुळे होमआयसोलेशनसह कोविड केंद्रातील बाधित रुग्ण सध्या स्थिर असून त्यांच्यावर कुठलेच गंभीर लक्षणे आढळून येत नाही त्यामुळे तालुक्यातील तिसरी लाट गंभीर नसल्याने आरोग्य विभागाच्या दुसऱ्या वरून स्पष्ट झाले आहे जरंडी  कोविंड केंद्रात संशयित उपचारासाठी आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णावर ही चाचण्या करण्यात येत असून चाचण्या नकारात्मक अहवाल येण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here