जिल्हातील प्रत्येक गावखेड्यात युवक काँग्रेस डिजिटल मेंबर्शिप करणार:- जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील (व्हिडिओ)

0
35

जळगाव, प्रतिनिधी । युवक काँग्रेसच्या वतीने आज डिजिटल मेंबरशिप साठी युवक मेळाव्याचे आयोजन शहरातील काँग्रेस भवन येथे करण्यात आले आगामी काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवकांचे संघटन मजबूत व्हावे या उद्देशाने काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार, प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार शिरीषदादा चौधरी व प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील उपस्थित होते. आगामी काळात डिजिटल मेंबरशिप च्या माध्यमातून प्रत्येक घरा घरात युवक काँग्रेस पोहचणार.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून डिजिटल मेंबरशिप काँग्रेसची प्रत्येक गावात खेड्यांमध्ये तालुक्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये करायची असून याच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, आमदार शिरीष दादा चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही युवक काँग्रेस मेळाव्याचे आयोजन केले आहे डिजिटल मेंबरशिप मध्ये जळगांव जिल्हयासह प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावात खेळयामध्ये जाऊन त्यांना जास्तीत जास्त संख्येने काँग्रेस मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी डिजिटल मेंबर्शिपचा शुभारंभ करत आहोत. मोबाईलच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक गावात खेड्यात जाऊन प्रत्येक माणसापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार समजवून त्याला काँग्रेस पक्षामध्ये जोडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे येत्या 20 जानेवारी पासून या मोहिमेची सुरवात करण्यात येणार आहे. असे सांगत प्रा. हितेश पाटील यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला.

या युवक काँग्रेस मेळाव्यात प्रमुख उपस्थिती मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, महानगरअध्यक्ष श्याम तायडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश दादा पाटील, धनंजय चौधरी, आशुतोष पवार, जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, मुजीब पटेल, बाबा देशमुख, डि. डी. पाटील सर, चेतन बाविस्कर, पराग घोरपडे, महेश पाटील, चेतन बाविस्कर, राजू जाधव, योगेश पाटील, प्रवीण पाटील, शुभम पाटील, सुलतान सय्यद, बंटी पाटील, गजानन पाटील, जितेंद्र पाटील, जयेश गावंडे, दिग्विजय सूर्यवंशी आदींची या मेळाव्यासाठी उपस्थिती होती.

डिजिटल मेंबरशिप मे काँग्रेसचे संघटन होणार मजबूत युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांचे मत

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी डिजिटल मेंबरशिप चा फायदा होणार असून तळागाळापर्यंत काँग्रेसचे विचार पोहोचण्यास मदत होणार आहे तसेच गाव खेड्यापर्यंत काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यात येईल असे मत युवक जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here