बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात सुध्दा चुरस कायम

0
24
बोदवड:-( महेंद्र पाटील) बोदवड नगरपंचायत निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओ बी सी. जागेवरील निवडणुका
सर्वासाधारण प्रवर्गातून होत आहेत. त्या नुसार बोदवड
नगरपंचायत निवडणूकीतसुद्धा दुसऱ्या टप्प्यात चार जागांच्या साठी निवडणूक होत आहेत. या चार पैकी दोन जागा महीला राखीव आहेत.
पहिल्या टप्यात झालेल्या तेरा जागांवर अत्यंत चुरशीने
निवडणूका लढल्या गेल्या त्यामुळे चार जागेसाठी सुद्धा ती चुरस अजून कायम आहे. नगरपंचायतीवर सत्ता काबीज करण्यास एक एक जागा महत्वाची आहे याची जाणिव झाल्याने राजकीय पक्षाचे शर्थीचे
प्रयत्न सुरू आहे. पहिल्या टप्यातील
निवडणुकीसाठी वेळ कमी भेटला तर या वेळी जास्त वेळ भेटल्याने
 प्रचाराचे व तडजोडीचे नियोजन करण्यास भरपूर वेळ भेटल्याने
उमेदवारांची तर सोय झालीच सोबत काही मतदारांची सुद्धा
चंगळ झाली. कोरोनाचा प्रभाव वाढता असल्याने सर्वच राजकीय
पक्षांनी जाहीर सभा टाळून वैयक्तिक गाठी भेटी व रॅलीद्वारे प्रचार केला. सोशल मिडीयावरपण कार्यकर्त्यांचे व समर्थकांचे
आरोप प्रत्यारोप रंगले. पहिल्या टप्यात झालेल्या निवडणूकीत
आपनच पुढे  असे दावे करत शिवसेना व राष्ट्रवादी मतदान मागत आहेत तर भाजपसुद्धा किंग मेकरची भूमिका पार पाडण्यास मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे येणाऱ्या राजकारणाची दिशा काय हे
निवडणूकीत दिसणार असल्याने राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप जोमाने या निवडणुकीत मेहनत घेत आहेत अनेक वर्षांपासून
मतदार संघावर पकड ठेऊन असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे हे त्यांच्या समर्थकांसाठी  मेहनत घेत आहेत. आज बोहवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस साठी खडसे हेच आधार  आहेत.सोबतच
अँड. खडसे खेवलकर यांचीसुद्धा भविष्यातील वाटचाल
सोयीची कशी राहील हा सुद्धा खडसे यांचा प्रयत्न
दिसुन येत आहे. जिल्हाध्यक्ष अँड रवींद्र पाटील यांनी सुद्धा
रोहीणी खडसे यांचे सोबत राहून प्रभाग पिंजून काढले . दुसरीकडे
शिवसेना कार्यकर्ते यावेळीसुद्धा उत्साहाने निवडणूकीत काम करीत आहेत कोरोनामुळे विश्रांती घेत असलेली आमदार चंद्रकांत पाटील हे
शेवटच्या टप्प्यात प्रचारात सक्रिय झाले व त्यांनी प्रभागांना भेटी
देत नागरीकांशी संवाद साधत कौल मागितला. भाजपचे स्टारप्रचारक
आ. गिरीष महाजन हेच होते त्यांनीसुद्धा उमेदवारांसोबत रॅलीत
सहभाग घेत जोरात
प्रचाराचा धुरळा उडवून दिला रंगलेला राजकीय कलगीतुरा, अभूतपूर्व आपने सामने झालेल्या
प्रचारसभा मतदानाचे वेळी झालेले वाद आणि
त्याचे मुक्ताईनगर तालुक्यात
उमटलेले पडसाद यांचा सुद्धा या निवडणूकीवर प्रभाव
राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here