पहुर. ता.जामनेर-येथील जिजाई चँरिटेबल ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या गुणवंताचा गौरव करण्यात आला.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथील ईंग्रजी शिक्षक तसेच इंग्लिश टीचर असोसिएशन चे कार्यकारी संचालक शंकर रंगनाथ भामेरे यांनी असोसिएशन आँफ इंग्लिश टीचर(आईनेट)आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्या तर्फे आयोजित तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला. तसेच पहुर पेठ येथील ऋषिकेश चंद्रकांत पांढरे याची जळगाव पोलिस दलात निवड झाल्याबद्दल आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका पल्लवी वानखेडे राऊत यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा घेण्यात आलेल्या शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम पदवी(बीएड)या परिक्षेत प्रथम वर्षात९२.६१टक्के गुण मिळवून सुयश संपादित केले याबद्दल या तीनही गुणवंताचा शाल,पुष्पहार व श्री फळ देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्ष स्थानी रामचंद्र वानखेडे सर होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन माळी सर यांनी केले. यावेळी जिजाई चँरिटेबल ट्रस्ट चे डॉक्टर रवींद्र बडगुजर, पोलिस पाटील विश्वनाथ वानखेडे, गजानन सोनवणे, प्रविण कुमावत, सादीक शेख,दत्तात्रय पवार, शरद पांढरे आदी उपस्थित होते.