बापाची चप्पल मुलाने घातली म्हनुन् तो बाप होत नाही :एकनाथ शिंदें

0
65

मुंबई : प्रतिनिधी  ठाण्यातील कळवा येथे खारेगाव उड्डाणपुल लोकार्पण सोहळ्यादरम्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद पेटला . दोन्ही नेत्यांमध्ये उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या. हा वाद चिघळतच चालला आहे. यावरून आता शिवनेतेचे नेते, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांना सुनावले.
आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते, मात्र त्यांना ते जमले नाही,बापाची चप्पल मुलाने घातली तर तो बाप होत नाही, त्यांनी निदान तसे वागायला पाहिजे, असा शब्दात एकनाथ शिंदे यांनी परांजपे यांच्यावर ताशेरे ओढले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे काम सुरळीत सुरु आहे. कोरोनाच्या संकटातही मुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. न्यायालयानेही राज्य सरकारचे कौतुक केले आहे. हेच भाजपच्या नेत्यांना खुपत आहे. त्यामुळे त्यांचे नको ते उद्योग सुरू आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी भाजपाला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here