पहूर , ता .जामनेर ( प्रतिनिधी )असोसिएशन ऑफ इंग्लिश टीचर्स ( आईनेट ) आणि ब्रिटीश कौन्सिल , इंडिया यांच्या तर्फे आयोजित तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेत पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी शिक्षक तसेच इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशनचे कार्यकारी संचालक शंकर रंगनाथ भामेरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला .
कोरोना , डेल्टा , ओमिक्रॉन विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जगभरात शिक्षण प्रणाली मध्ये अमुलाग्र बदल होत असून विविध नवप्रवाह शिक्षण क्षेत्रात येत आहेत .या बदलांच्या आणि नवप्रवाहांच्या अनुषंगाने AlNET आणि British council India यांच्या वतीने Changing Learners , Changing Teachers TLE in the New World या विषयावर ७ ते ९ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले . या परिषदेत आईनेट सेक्रेटरी अमोल पडवाल ( दिल्ली ) , अध्यक्ष विवेक जोशी (गडचिरोली ) , हॅरी कुचाह कुचाह , (युके ) , इरीना कुद्रीत्सेवा ( बेलारूस ) जेसन अँडरसन (युके ) नदीम खान , सिध्देश सर आदींसह देश-विदेशातील तज्जांनी मार्गदर्शन केले .
या परिषदेत रिसर्च पेपर प्रेझेन्टेशन , पोस्टर मेकिंग , स्टोरी टेलिंग , पोएम कंपोझिशन , सिम्पोसियम आदी ऍक्टिव्हिटीज राबवण्यात आल्या . देशोदेशीच्या
शिक्षकांनी कोरोना काळात आपल्या शाळेवर राबवलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले . या परिषदेत शंकर भामेरे यांनी यामध्ये सहभाग नोंदविला . त्यांच्या या सहभागा बद्दल इंग्लिश टिचर्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ , गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे , महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे , हरिभाऊ राऊत आदींनी अभिनंदन केले .