बेकायदा गर्भपातासाठी मिळत होती सांकेतीक भाषेतील चिठ्ठी

0
51

वर्धा, वृत्तसंस्था । वर्धा (Wardha) शहरातील कदम रुग्णालयाच्या परीसरात मानवी कवट्या आणि काही अवशेष आढळल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. प्रकरणात आता वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये (Arvi) असलेल्या कदम रुग्णालयाच्या डॉ.नीरज कदमला (Dr.Niraj Kadam) अटक करण्यात आली. शनिवारी रात्री पोलिसांनी नीरजला (Dr.Niraj Kadam) अटक केली असून अटकेतील संशयीतांची संख्या आता सहा झाली आहे. दरम्यान, कायद्याला वेशीवर टांगून गर्भपात करणार्‍या आर्वीतील डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये (Warda Kadam Hospital) अवैध गर्भपाताची नोंदच टाळून सांकेतिक भाषेत गर्भपाताची चिठ्ठी तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

घरातून मिळाली काळविटाची कातडी
डॉ.निरज कदमच्या (Dr.Niraj Kadam) घरामधून तपासणीदरम्यान काळविटाची कातडी जप्त करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्या अधिकार्यांनी हॉस्पिटल गाठून कातडी जप्त केलीय. गर्भपात प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी पोलिसांकडून घर झडती सुरू होती. येथून कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळालीय. यावेळी पोलिसांना वन्यप्राण्याची कातडी आढळून आली. ही माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. वनविभागाच्या चमूनं हॉस्पिटल गाठून पंचनामा करत कातडी जप्त केलीय. प्रथमदर्शनी ही कातडी काळविटाची असल्याचं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. जप्त केलेली कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here