मुंबई, वृत्तसंस्था । जगविख्यात कथ्थक नर्तक तथा पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मिडियाद्वारे दिली आहे.
कला क्षेत्राचे मोठे नुकसान
कलेच्या क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीच्या जाण्याने कलेचे आणि देशाचेही मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. बिरजू महाराज हे लखनौ घराण्याचे होते. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला होता. त्यांचे खरे नाव हे पंडित बृजमोहन मिश्रा असे आहे. बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कथ्थक नर्तक तसेच ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराजांचे (Pandit Birju Maharaj) वडील तथा गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध कथ्थक नर्तक आहेत.