मातृ पितृ हरपलेल्या मुलींना वधूवरांकडून मायेचा हात

0
41

धानोरा, ता. चोपडा ः प्रशांत चौधरी
सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांची परिस्थिती खालावली असलेल्यामुळे यंदा दिवाळीच्या पणत्या प्रत्येकाच्या घरी उजळतांना अडचणींचा अंधकार आल्याने खरतर ज्या मुलींचे मातृ-पितृ छत्र हरपले अशा मुलांच्या जीवनातील अंधकार दूर करावा, याची जाणीव ठेवून धानोरा येथील वधू-वराने आपल्या साखरपुड्याच्या मुहूर्ता प्रसंगी गावातील मातृ-पितृ छत्र हरपलेल्या मुलींना शिक्षणासाठी हातभार लागावा या हेतूने तीन मुलींचा वर्षभराचा खर्च उमेश उर्फ हिमांशू व डॉ. मयुरी या नवदाम्पत्याने नवीन जीवनाची सुरुवात एका चांगल्या उपक्रमाने करून समाजातील तरुणांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.
वास्तविक विवाह म्हटला म्हणजे खर्चाची परवनी आलीच. मात्र, याला फाटा देत या नवदाम्पत्यांनी मातृ-पितृ हरवलेल्या मुलींच्या जीवनातील अंधःकार दूर करण्यासाठी या मुलींना शिक्षणासाठी हातभार लावल्याने उपस्थित लोकांनाही गहिवरुन आले. उमेश उर्फ हिमांशू व डॉ. मयुरी या दाम्पत्याने नवीन जीवनाची सुरुवात मातृ-पितृ हरवलेल्या मुली हिमानी गोकुळ गुजर (इयत्ता १२ वी), अर्चिता गजानन महाजन (इयत्ता ९ वी.) व जान्हवी प्रवीण सपकाळे (इयत्ता ९ वी) या मुलींना विवाह प्रसंगी शालेय शिक्षणासाठी वह्या, पुस्तके, कपडे, दप्तर व इतर खर्च म्हणून सात हजार रुपये प्रत्येकी तीन जणांना देऊन अंधकारमय जीवन जगणार्‍या होतकरू मुलींना एक वर्षाचा खर्च देऊन आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करताना तरुणांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. उमेश हा जीएसटी ऑफिसर कल्याण असून धनंजय जगन्नाथ पाटील यांचे चिरंजीव आहे. तर डॉ.मयुरी पाटील या धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते महेश नीळकंठ महाजन यांची कन्या आहेत.
याप्रसंगी चोपडाचे तहसीलदार सी.एम.वाघ, नायब तहसीलदार राजेश पऊळ, मुख्य आरोग्य निरीक्षक कल्याण, डोंबिवली महानगरपालिका धनंजय पाटील, जीएसटी ऑफिसर कल्याण लखीचंद पाटील, चोपडा पंचायत समितीचे माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सामाजिक कार्यकर्ते महेश महाजन, विकास महाजन, माजी ग्रा. सदस्य प्रदीप महाजन, देविदास महाजन सर बहुसंख्य ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here