नाशिक, वृत्तसंस्था । नाशिक जिल्ह्यातील जवानांसह दोन जण नेपाळ येथील विरपुर सीमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद झाल्याची घटना घडली.
नाशिक जिल्ह्याच्या नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील मुळ रहिवासी असलेल्या जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आले आहे. अमोल हिम्मतराव पाटील (वय – ३०) असे जवानाचे नाव आहे. विजेच्या तारांचा धक्का लागल्याने अमोल याचा मृत्यू झाला आहे. सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील विरपूर सीमेवर अमोल कर्तव्यावर असतांना हा प्रकार घडला. मकर संक्रांतीच्या दिवशी अमोलसह अन्य दोघांना देखील वीरमरण आले आहे.
