यावल पोलिसांकडून अवैध सावकारीचा भांडाफोड झाल्याने सर्वत्र कौतुक

0
29

यावल, प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अवैध सावकारी करणाऱ्या एका तरुणावर मकरसंक्रांतीच्या दोन दिवस आधी कायद्याची संक्रांत कोसळल्याने,अवैध सावकारीचा भांडाफोड झाल्याने पर्यायी गुन्हा दाखल झाल्याने राजकीय आश्रय घेणाऱ्या,माहितीचा अधिकाराचा,आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवून वैयक्तिक हेतू साध्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांस व त्याच्या नेतेमंडळीस मोठी कायदेशीर चपराक बसल्याचे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
अनधिकृत सावकारीच्या माध्यमातून यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात ज्या नागरिकांची, महिलांची,सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांची आर्थिक पिळवणूक झालेली आहे किंवा अनाधिकृत सावकारांनी दादागिरी करून मारझोड करून ज्यांच्या शेतजमिनीवर,घरावर,प्लॉटवर बेकायदा कब्जा करून ठेवलेला आहे तसेच दुचाकी चारचाकी वाहने ताब्यात घेतलेली आहे त्यांनी तसेच माहिती अधिकाराचा(शासकीय कार्यालयात माहिती अधिकार अर्ज टाकले आणि त्या माहितीचे काय केले याबाबत चौकशी झाल्यास)आणि काही ठिकाणी ॲट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवून मासिक हप्ते वसूल करण्याचा धंदा सुरू केला आहे याबाबत संबंधितांनी यावल पोलिसांकडे संपर्क साधल्यास यावल तालुक्यात अवैध सावकारी चे फार मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे.
अवैध गावठी पिस्तूल बाळगल्याने शहरातील सुमित युवराज घारू वय 21 हा तरुण अटकेत होता आणि आहे या गुन्ह्याच्या तपासात यावल पोलिसांत चौकशीअंती अवैध सावकारी चे प्रकरण समोर आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील दहीगाव येथील एकाने सुमित घारू या तरुणा विरुद्ध अवैध सावकारी, खंडणी उकळली व घरातील साहित्य उचलून नेल्याची तक्रार दिली दरम्यान दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात या आरोपीला गुरुवारी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहरातील श्रीराम नगर मधील रहिवासी सुमित युवराज दारू यांच्याकडे दोन जानेवारीला गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले होते त्यांच्याकडील दुचाकी देखील चोरीची निघाली होती या गुन्ह्याला आवडत सावकाराचे वलय असल्याची शक्यता पोलिसांनी आणि नागरिकांनी वर्तविली होती आणि याबाबत तालुक्यात अवैध सावकारी बाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती दरम्यान दहीगाव येथील गुलाब कडू मिस्तरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावातील मयूर विजय पाटील याने सुमित युवराज दारू यांच्याकडून मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी दीड वर्षापूर्वी 50 हजार रुपये व्याजाने काढून दिले होते शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतला होता या पैशाच्या मोबदल्यात आतापर्यंत 1 लाख 35 हजार रुपये व्याजासह परत केले आहे तरीसुद्धा सुमित घारू हा पैशाची मागणी करत होता त्याने एक दिवशी फिर्यादीच्या घरातील एलईडी टीव्ही,मोबाइल, होम थिएटर,फ्रीज अशा वस्तू उचलून नेल्या आणि कोणाकडे ही तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी सुमित दारू विरुद्ध अवैध सावकारी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे.
एका राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा सुद्धा या अवैध सावकारी प्रकरणाशी सरळ संबंध येत असल्याने त्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचे राजकीय पद सुद्धा धोक्यात आल्याचे आणि यावल शहरातील एका राजकीय पक्षाच्या सदस्याचा सुद्धा या प्रकरणाची मोठा सहभाग असल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेते मंडळी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here