कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यान्वये वेतन मिळावे

0
28

यावल, प्रतिनिधी । कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे अशी मागणी यावल तालुका भीम आर्मी अध्यक्ष प्रवीण डांबरे व पदाधिकाऱ्यांनी यावल नगर परिषद येथे मागील काही वर्षा पासून कंत्राटी सफाई कामगार रोजाने काम करीत आहेत. तरी त्या मजुरांना जे वेतन दिले गेले पाहिजे ते दिले जात नाही. किमान वेतना पासून त्याना वंचित ठेवण्यात येत आहे असे आमच्या निर्दशनास आले आहे.

ज्या कामगारानी स्वच्छ भारत अभियान २०२१ अंतर्गत कचरा मुक्त शहर या केंद्र शासनाचा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशपातळीवर आपल्या यावल नगरपालिकेला ४ था गुणक्रमांक प्राप्त करुन दिला त्याच कामागरांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. कमी वेतन मिळत नसल्यामुळे त्यांच्या जिवन आवश्यक गरजा देखील पूर्ण होत नसून त्यांना नाहक आर्थिक त्रास होत आहे.त्याच प्रमाणे त्यांच्या मुलांच्या शिक्षण,आरोग्य व जीवनातील प्रत्येक गोष्टी वर परिणाम होत आहे. कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामगारांन सारखी निवास व्यवस्था,वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय खर्चाची भरपाई. शारिरिक तपासणी अशा सुविधा मिळत नाहीत.याचा कंत्राटी कामगारांच्या राहणीमान व आरोग्यावर दुप्परिणाम
होत आहे.आर्थिक पिळवणूक होत आहे.

कंत्राटी कामगारांना कामाच्या ठिकाणी ज्या सुविधा आवश्यक असतात त्या सुविधा नियुकत्ताकडून किंवा कंत्राटदाराकडून पुरविल्या जात नाहीत,मजुरीचे काम जाण्याची भीती असल्यामुळे त्या बाबत कंत्राटी कामगारांना आवाज उठविता येत नाही आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये त्यांना काम करावे लागत आहे.कंत्राटदाराने मजुरांचे कामाचे देण्यात येणारे वेतन बैक खात्यावर किव्वा धनादेशाद्वारे दिले पाहिजे परंतु आमच्या निर्दशनास आल्या प्रमाणे ते तसे दिले जात नसून त्यांना रोख स्वरुपात दिले जात आहे व मनमानी कारभार चालत आहे आणि सरकारी नियमांचा भंग करत आहे.त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशा नुसार योग्य दर निश्चित
करून सुद्धा त्यांना कमी वेतन दर दिले जात आहे.तरी आपणास विनंती करण्यात येते कि आपण
संबंधित ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करुन यावल नगर परिषद कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यान्वये वेतन मिळणेसाठी कार्यवाही करावी असे दिलेल्या निवेदनात भीम आर्मी तालुकाध्यक्ष प्रविण डांबरे यांनी व सदस्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here