Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पोलीस विधी अधिकारी जागीच ठार; एक जखमी
    क्राईम

    पोलीस विधी अधिकारी जागीच ठार; एक जखमी

    saimat teamBy saimat teamJanuary 20, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर बांभोरी जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पोलीस विभागातील विधी अधिकारी जागीच ठार झाले तर
    त्यांच्यासोबत असलेला एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. हे दोन्ही जण आज सकाळी पारोळा येथे कामानिमित्त जात असल्याचे समजते. या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
    याबाबत माहिती अशी की, जिल्हा पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दुर्गादासगिरी गोसावी (रा.पाचोरा) आणि शनीपेठ पोलीस स्थानकात कार्यरत संदीप भिकन पाटील (रा. पोलीस वसाहत, जळगाव) हे आज सकाळी दुचाकीने जळगावहून पारोळ्याकडे कामामित्त जात होते. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर बांभोरीजवळ त्यांना एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने जात असतांना जबर धडक दिली. या अपघातात दुर्गादासगिरी गोसावी हे जागीच ठार झाले तर संदीप भिकन पाटील हे गंभीर जखमी झाले. संदीप पाटील यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दुर्गादासगिरी गोसावी यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. पार्थिव जिल्हा रुग्णालयात पोहचताच मृत गोसावी यांचे नातेवाईकांसह मित्र परिवाराने एकच हंबरडा फोडला.
    याबाबत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते. दरम्यान, दुचाकीला धडक देणार्‍या वाहन चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले असून आता त्याचा शोध घेतला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.