चाळीसगाव(प्रतिनिधी)- कन्नड घाटात हैद्राबाद येथील स्टाईलस ने भरलेली आयसर गाडी पलटी झाली होती प्रचंड प्रमाणात गाडीचे नुकसान झाल्याने ट्रान्सपोर्टचे मालक शाहिद अली यांनी कन्नड घाटाजवळ असलेले राज ढाबाचे मालक बिस्मिल्ला शेख उर्फ छोटू पहेलवान यांच्याशी संपर्क साधला अपघात झालेला आयशर इन्शुरन्स क्लेम साठी गाडी धाब्यावर लावून घ्या छोटू पहेलवान व ट्रान्सपोर्ट मालक यांच्यात अपघात झालेल्या आयशरची खरेदी विक्री संमतीने करण्यात आली राज धाब्यावर इन्शुरन्स अधिकारी गेले असता त्यांना राज ढाबा येथे अपघात झालेली आयशर जागेवर न दिसल्याने त्यांनी गाडी मालक राजू भाई करंगीया रा.बडोदा गुजरात यांना इन्शुरन्स अधिकारी यांनी कळविले त्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गाडी मालक यांनी गाडी चोरीस गेली असा अर्ज दाखल केला सदर पोलिसांनी चौकशी केली असता त्या आयशर गाडीचा ट्रान्सपोर्ट मालक शाहिद अली यांनी छोटू पहेलवानला गाडी विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर गाडी मालक राजू भाई कंगारिया व छोटू पहेलवान यांनी आपसात समजुतीचा करारनामा करण्यात आला व पोलिस स्टेशनमध्ये दिलेला अर्ज मागे घेतले त्यात छोटू पहेलवान यांच्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत अशे लेखी पत्रक दैनिक साईमतला बिस्मिल्ला शेख उर्फ छोटू पहेलवान यांनी दिले आहे