जळगाव, प्रतिनिधी। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आज जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
दि. १२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शालिनी सोनवणे यांनी जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेऊन व स्वामी विवेकानंदासारखे शांत संयमी आणि तेजस्वी राहता आले पाहिजे, तसेच महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनी महिलांना सभासद नोंदणी कशी करावी. संघटन जास्तीत जास्त वाढवले पाहिजे. विकास मराठे यांनी सभासद नोंदणी फॉर्म कसा भरावा याची माहिती दिली. सर्व कार्यकारणीतील महिलांची सभासद नोंदणी करुन घेण्यात आली व काही महिलांना पदे वाटप करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. शालिनी सोनवणे, अश्विनी देशमुख, मिनाक्षी चव्हाण , सुमन बनसोडे, मिनाक्षी शेजवलकर, आशाताई येवले, सुचेता नेवे, शीला पाटील, नेहा जैन, कमलाबाई शिरसाठ, वर्षा राजपूत, मनिषा साळी, पूजा पाटील, ज्योती खरे, हर्षाली तिवारी, रुपाली भामरे व कार्यकर्ते उपस्थित होते.



