चेन्नई : वृत्तसंस्था I दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने अखेर भारताची बॅडमिंटनपूट सायना नेहवालची माफी मागितली आहे. सिद्धार्थने सायना नेहलावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच्या या टीकेवरुन सोशल मीडियावरुन नेटिझन्सनी संताप व्यक्त केला होता.
राष्ट्रीय महिला आयागानेही याची दखल घेत सिद्धार्थला नोटीस पाठवली होती. सिद्धार्थने माफी मागावी अशी मागणी सायना नेहवालच्या कुटुंबीयांकडून केली जात होती. त्यामुळे आपल्या त्या टीकेसंबंधी स्षष्टीकरण देत बाजू मांडल्यानंतर आता सिद्धार्थने ट्विटरवरच जाहीर माफी मागितली आहे.