बीडमधील शेतकऱ्याच्या लेक झाली पोलीस कॉन्स्टेबल झाली ‘मिस महाराष्ट्र’

0
10

बीड, वृत्तसंस्था । बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकाविलाय. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या आहेत प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धजिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकाविलाय. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या या आहेत प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धजिंकल्यानंतर सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकाविलाय. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या २०१० साली बीडच्या पोलीस दलात कार्यरत झाल्या. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्यावर बजावत आहेत.

प्रतिभा यांना मागील अनेक वर्षांपासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. त्या आपल्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बराच प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांनी डिसेंबर अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अप होऊन मिस महाराष्ट्रापर्यंत मजल मारली आहे. केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही चांगल्या प्रकारे गाजवले आहे. यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवलीय.

“माझे आजोबा कुस्तीपटू होते. त्यांच्याकडून पाहून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी कुस्तीच्या रिंगणात उतरले. मी पोलीस दलामध्ये खेळाडू म्हणून जॉइन झाले. त्यानंतर लहानपणी शाळा, गॅदरींगमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे तेव्हाचे जे छंद होते ते आता जोपासले पाहिजे असं वाटलं. त्यातूनच सौंदर्य स्पर्धेकडे मी वळले,” असं प्रतिभा यांनी म्हटलं आहे.

“बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. येथे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण फारच कमी आहे. मी पालकांना आवाहन करु इच्छिते की मुलीचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करु नका,” असंही त्या म्हणाल्या. तसेच मुलींचा बालविवाह केला जाऊ नये यासाठी आपण जिल्ह्यात जनजागृती करणार असल्याचंही ते म्हणालेत. पोलीस दल, कुस्ती आणि मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींची सांगड घालत सांगळे यांनी ग्रामीण भागातील महिलांसमोर एक आदर्श घालून दिलाय. या यशानंतर पोलिस दलासह बीड जिल्ह्यात प्रतिभा सांगळे यांचं कौतुक होतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here