सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा चुराडा 

0
18
* चार महिन्यात एकाच जागी सहा वेळा फुटली पाईपलाईन 
* सरपंचांनी राजीनामा द्या तर नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा
पहुर – जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील चार महिन्यात एकाच जागी सहा वेळा पाईपलाईन फुटल्याने सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा चुराडा होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलले जात असून सरपंचांनी राजीनामा द्या तर पहूर कसबे ग्रामपंचायतला नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा अशी जोरदार मागणी केली जात आहे.
    पहूर कसबे गावातील लेले नगर भागात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने गेल्या नऊ दिवसांपासून या भागातील नागरिकांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या नळांना पाणी आले नाही त्यामुळे धरणात पाणी साठा असूनही गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली विशेष म्हणजे पाईपलाईनचे काम एक किंवा दोन दिवसात पूर्ण नव्हता तब्बल सहा दिवस चालल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पहूर शेंदुर्णी रोडवरील लेले नगर भागातील पाईपलाईन गेल्या चार महिन्यात एकाच जागी सहा वेळा फुटली असल्याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे एवढेच नव्हे तर या वेळेसही पाईप ओले असतांनाच  सोलेशन लावून हे पाइप जोडण्यात आले आहेत पाईप कोरडे न करता ओल्या पाइपला सोलेशन लावल्याने पुन्हा ही पाईपलाईन फुटेल असे येथील उपस्थित नागरिक बोलत होते. चार महिन्यात एकाच जागी सहा वेळा पाईपलाईन फुटल्याने सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा चुराडा होत असल्याचे बोलल्या जात असून पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी राजीनामा द्या तर पहूर कसबे ग्रामपंचायतला नवीन ग्रामविकास अधिकार्‍यांची नियुक्ती करा अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here