नेरी येथील चाकू हल्ला प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्त मजुरी सह पांच हजार रुपये दंड.

0
33

 

जामनेर- प्रतिनिधी     तालुक्यातील नेरी बु!! येथील रहिवाशी आरोपी विजय अनिल रोकडे यास चाकू हल्ला प्रकरणी येथील न्यायाधीश डी. एन. चांभले यांनी एक वर्ष सक्त मजुरी व पांच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या गुन्हा बाबत सविस्तर वृत्त असे की, दी.१४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी नऊ वाजे च्या सुमारास आरोपी विजय अनिल रोकडे याने दारूच्या नसेत फिर्यादी प्रशांत राजू आपार यास नेरी येथील आठवडे बाजारात शिवीगाळ करून धारधार सुरीने त्याच्या पार्श्वभागावर मारून गंभीर दुखापत करून फिर्यादी व त्याचे आई वडीलांसह इतर साक्षीदारांना सुध्दा जीवे मारण्याची धमकी दिली होती. म्हणून या बाबत आरोपी विरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या खटल्यामध्ये सरकार पक्षा तर्फे फिर्यादी त्याची आई, घटना स्थळ, जाती पंच, वैद्यकीय अधिकारी आदींसह एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पंचांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
या खटल्या मध्ये सरकार पक्षा तर्फे सहा. सरकारी आभियोकत्ता अनिल सारस्वत यांनी कामकाज बघितले तर, पोलीस कॉन्सटेबल निलेश सोनार यांनी त्यांना सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here