फारुक अन्सारी यांचा निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मान

0
130

जळगाव ः प्रतिनिधी
येथील खान्देश उर्दू कौन्सिलतर्फे दैनिक उर्दू टाइम्सचे निवासी संपादक फारुक अन्सारी यांना निर्भीड पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय उर्दू पत्रकारांच्या मेळाव्यात त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री. अन्सारी हे ३३ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून त्यांनी पत्रकारितेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कौन्सिलचे अध्यक्ष अकिल खान ब्यावली, सचिव सइद पटेल यांनी फारुक अन्सारी यांनी पत्रकारिता व आपल्या लेखनीद्वारे समाज व राष्ट्रहितासाठी, रंजलेल्या गांजलेल्यांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी केलेल्या निर्भीड तसेच राष्ट्र घडविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय पत्रकारितेसाठी निर्भीड पत्रकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याचे सांगितले. आपल्या सत्काराला उत्तर देताना फारुक अन्सारी म्हणाले की, लेखनीमध्ये फार ताकद असते. याद्वारे जगात कित्येक क्रांती घडल्या. म्हणून लेखनीचा सदुपयोग करणे आवश्यक आहे. पुरस्कार मिळाल्याच्या समाधानाबरोबर जबाबदारीही वाढते, असे मला वाटते, असे ते म्हणाले. यावेळी वासिक नवेद खामगाव, आबीद हुसेन धुळे, सगीर अन्सारी गोवंडी, अफसर खान मुंबई, शहेजाद अन्सारी, अब्दुल्लाह, तौसिफ पटेल इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here