शेतमालाला लाभकारी मुल्य कायदा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन

0
33

जळगाव, प्रतिनिधी । शेतमालाला लाभकारी मुल्य मिळावे म्हणून कायदा करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी देशभरातून महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान व कृषी मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून साकडे घालण्यात आले.कोविडच्या नियमांचे पालन करतांना धरणे आंदोलन रद्द करीत निवेदन देण्यात आले.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांना शेती परवडत नसून तोट्याचा व्यवहार ठरत आहे.केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घेतल्यामुळे शेतमालाला भाव मिळतांना शेतकरी नाडला जात आहे.एम.एस.पी.प्रमाणे शेतमालाला भाव मिळतच नाही.त्यामुळे शेतकरी आर्थिक खाईत लोटला गेला आहे.परिणामी प्रसंगी शेतकरी आत्महत्त्येसारख्या टोकाच्या भुमिका घेण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र सरकारला बदलावयाचे असल्यास परिश्रमाने उत्पादीत मालाला योग्य भाव तसेच नफा मिळणे गरजेचे आहे.त्याकरिता शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव,त्याचा व्यवस्थापन मुल्य मिळावे.त्यामुळे लाभकारी मुल्य शेतमाला देण्या संदर्भात कायदा करण्याची आग्रही मागणी भारतीय किसान संघाने राष्ट्रपती, पंतप्रधान व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कचेरीत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांना सादर करण्यात आले.यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, मंत्री डॅा.दिपक पाटील, कोषाध्यक्ष श्रीकांत नेवे,भरतसिंग राजपूत,कैलास ताडे,नारायण पाटील आदी कार्यकर्ते हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here