जळगाव, प्रतिनिधी I महानगरपालिकेची विशेष महासभा सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सभेत 42 कोटींच्या रस्त्यांसह 85 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली जाणार आहे. याशिवाय महापौरांना महापालिकेच्या माध्यमातून निवासस्थान देण्यावर प्रथमच सभागृहात चर्चा होईल. या अगोदर झालेल्या ऑफलाईन सभेत काही मुद्यांवरून गुद्यापर्यंत विषय आला होता. मात्र आजच्या ऑनलाईन सभेत सर्व कामकाज शांततेत पार पडले.
महापौर जयश्रीताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात पहिलीच ऑफलाईन महासभा झाली व ती काही प्रश्नांवर वादग्रस्तही ठरली होती. आज दुसरी महासभा पुन्हा ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली व त्यात महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियानांतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी मंजूर 42 कोटींच्या निधीतील कामांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याशिवाय विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.विषय पत्रिकेवरील 24 विषयांवर सभेत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.त्यात मेहरूण भागात नाल्यास संरक्षण भिंत बांधण्यासोबत पिंप्राळा व अयोध्या नगरासह शहराच्या मध्यवर्ती भागात काँक्रीट गटारींच्या कामांच्या विषयाचा समावेश होता. नागरी दलितेतर वस्त्यात सुधारणा योजनेंंर्तगत अनेक कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत त्यात गटारींसोबतच डांबरी रस्त्याच्या कामांचा समावेश आहे.या विषयांनाही मंजुरी देण्यात आली.