यावल, प्रतिनिधी । अवैध वृक्षतोड करून शिवसेना जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांस आणि सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर वाहतूक करून टाकल्याने त्या शिवसेना जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होऊन लाकूडतोड्याने असे का केले याचा जाब विचारण्यासाठी जिल्हास्तरीय शिवसेना पदाधिकारी आपल्या सदस्यांसह वनक्षेत्रपाल पदमोर यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेले असता
वनक्षेत्रपाल यांनी त्यांना महत्व न देता तुम्ही मला निलंबित करा,किव्वा बदली करा असे म्हणत चांगलाच पाणउतारा केला असल्याचे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की रावेर यावल चोपडा तालुक्याचा उत्तर भाग म्हणजे पूर्व-पश्चिम रेषेतील मोठे कार्यक्षेत्र हे सातपुडा पर्वतात येते या सातपुड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जळगाव येथे यावल वन विभाग मुख्य कार्यालय कार्यरत आहे.सातपुड्यातील वनसंपत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यावल पूर्व-पश्चिम वनक्षेत्र तसेच वन्यजीव अभयारण्य यावल येथे स्वतंत्र विभाग आहे.
असे असताना यावल पूर्व पश्चिम क्षेत्रातून तसेच अभयारण्यातून खुलेआम सागवानी लाकडाची व इतर मौल्यवान वृक्षांची अनधिकृत कत्तल व वाहतूक रावेर यावल चोपडा तालुक्यातील परिसरातून सर्रासपणे सुरू आहे यासोबत इतर वन संपत्तीची सुद्धा अनधिकृत लूट सुरू आहे.यात डिंक तेंदूपत्ता आणि आता गौण खनिजाचे उत्खनन करून अवैध गौण खनिज वाहतूक सुरू झाली आहे.
गेल्या आठवड्यात धानोरा अडावद परिसरात अवैध लाकडाची वाहतूक करणारा 1 ट्रक पकडून अडावद फॉरेस्ट डेपोला जमा असल्याचे समजते, त्याचप्रमाणे यावल पूर्व पश्चिम व क्षेत्रातून अनधिकृतपणे बेकायदेशीर रित्या अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून अवैद्य गौण खनिज वाहतूक करताना दोन डंपर आढळून आल्याने ते दोन डंपर यावल फॉरेस्ट डेपो मध्ये जमा केले आहेत.हेअवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर कोणाचे व कोठून कुठे वाहतूक करीत होते त्यांच्यावर पुढील कार्यवाही काय?त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत का? ईत्यादी अनेक प्रश्न गुलदस्त्यात अडकून असले तरी याबाबत प्रसिद्धीमाध्यमांना कोणतीही माहिती न दिल्याने वनक्षेत्रपाल पदमोर यांच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
