जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतुक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा नियोजन भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, विभाग नियंत्रक श्रावण सोनवणे, शल्यचिकीत्सक नागोजीराव चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक गणेश पाटील आदी उपस्थित होते.