माजी मंत्री गिरीश महाजन यांची कौतुकाची शाबासकी

0
37

भुसावळ : प्रतिनिधी
शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केले आहे. त्याबद्दल जास्तीत जास्त शेतकर्‍यांना आणि शेतकामगारांना माहिती व्हावी, त्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा, यासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी झटून प्रयत्न करावा, असे आवाहन
केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले होते आणि त्याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांनी त्यांच्या कृतीद्वारे दिला आहे, असे प्रतिपादन माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आ.गिरीश महाजन यांनी केले आहे.
वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे दोन दिवसीय निवासी प्रमुख पदाधिकारी राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर हे मुंबई येथे रामभाऊ म्हाळगी याठिकाणी सुरू असून त्यात या औषधपत्रकाचे अनावरण करण्यात आले. डॉ.नि.तु.पाटील हे वरणगाव (ता.भुसावळ) मधील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ असून विविध सामाजिक उपक्रमांसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे.रुग्णांना तपासणी पेपरवर औषधी लिहून दिल्यावर शक्यतो कागदाची दुसरी बाजू ही कोरीच राहते, हे लक्षात ठेवून त्यावर केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर मंत्री यांनी शेतकर्‍यांना दिलेले आश्‍वासन छापून येणार्‍या सर्व रुग्णांना त्याविषयी माहिती दिली जात आहे, असा हा अभिनव उपक्रम राबवणारे डॉ.नि.तु.पाटील हे आमचे सक्रिय एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, याचा आम्हांला अभिमान आहे.
यावेळी डॉ.नि.तु.पाटील यांच्या अभिनव औषधी पत्रकाचे अनावरण माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रभारी आ.गिरीश महाजन यांनी केले. यावेळी आ. संजय सावकारे, वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे, डॉ.राहुल कुलकर्णी, डॉ.विंकी रुगवानी, डॉ.अनुप मरार, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.बाळासाहेब हरपाळे, डॉ.श्याम पोटदुखे, डॉ. स्वप्नील मंत्री आदी मंडळी उपस्थित होती.
डॉ.नि.तु.पाटील यांनी याआधीही ‘जलसंवर्धन, अवयव दान, एकही फुलराणी जळणार नाही’ या विषयांवर याचप्रकारे जनजागृती केली आहे. आता शेती विधेयकाबद्दल केलेले कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असून नक्कीच इतरांनी त्यांच्या कार्याचे अनुकरण करावे.
– गिरीश महाजन,
आमदार, जामनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here