मुक्ताईनगर, प्रतिनिधी । श्री कानिफनाथ महाराज यांची मूर्ती चोरी करून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती. यात हि मूर्ती तीन तासात सापडली आहे.
तालुक्यातील उचंदा गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री कानिफनाथ महाराज यांची मूर्ती चोरट्यांनी रात्री चोरली होती. दरम्यान चोरीस गेलेली कानिफनाथ महाराज यांची मूर्ती अवघ्या तीन तासात सापडली. यामुळे चोरट्यांनी देव चोरला परंतु केवळ तीन तासातच देव पुन्हा परतला. या घटनेने संपूर्ण गावात व तालुक्यात खळबळ उडाली. सदर घटना सकाळी सहा वाजता किशोर भोलाने यांच्या निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली. घटनास्थळी पोलिस प्रशासन, गावचे पोलीस पाटील हे दाखल झाले. जळगाव वरून काही पथकही थोड्याच वेळात त्याठिकाणी आल्याने तपासाला सुरुवात करण्यात आली.
त्यात एक व्यक्ती पोलिसांकडे आला आणि त्यांनी सांगितले की माझ्या घरात ही मूर्ती एका व्यक्तीने आणली आहे. तात्काळ पोलीस निरीक्षक राहुल यांनी आपला पोलीस ताफा त्यांच्या घराकडे नेऊन मूर्ती ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणली. अशीच घटना पाच वर्षापूर्वी घडली होती, त्यावेळेस देखील चोरट्यांनी ही मूर्ती रात्री मंदिरातून घेऊन गेले होते. दरम्यान पाच ते सहा दिवसानंतर ही मूर्ती मंदिराच्या बाहेर पायरीवर आणून ठेवली होती. मात्र याचा तपास अद्यापही अपूर्ण राहिला होता. त्यावेळी सुद्धा आरोपीला अटक झाली नव्हती. मात्र ही घटना दिनांक 7 सात रोजी सकाळी सहा वाजता घडली आणि मूर्ती सुद्धा सापडलेली आहेत. परंतु पोलीस तपासा सुरू आहे. जितेंद्र लक्ष्मण पाटील (वय ४७, रा. उचंदा ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मी उचदा गावाचा पोलीस पाटील म्हणून गेल्या 6 वर्षा पासून येथील कामकाज पहात आहे.
उचंदा गावात कानीफनाथ महाराजांचे मंदीर असुन सदर मंदीरात नेहमी दर्शन घेण्यासाठी जातो. तेव्हा मंदीराला असलेला दरवाजा हा कायम उघडा असतो. दिनांक 07/01/2022 रोजी फिर्यादी सकाळी साडेसहा वाजता घरी असतांना त्यांना गावातील कीशोर भगवान भोलाणे यांचा फोन आला की, कानीफनाथ महाराजाचे मंदीरात मूर्ती दिसत नाही. यामुळे लागलीच कानीफनाथ महाराजांचे मंदीराकडे गेले तेथे किशोर भगवान भोलाणे हा भेटला त्यांचे समवेत मंदीरात जावुन खात्री केली असता मंदीरात महाराजांची मुर्ती नसल्याचे दिसून आले. दरम्यान याप्रकरणी पोलीस स्टेशनला फोन केला व काही वेळातच सदर ठीकाणी पोलीस आले.
तेवढ्यात त्या ठीकाणी गावातील भगवान सुकदेव भोलाणे, रमेश भीका भोलाणे, शेषराव कालु पाटील, शेख अकबर शेख अहमद, शेख सद्दाम शेख, सुरेश काशीनाथ बेलदार, वीजय घनश्याम पाटील वगैरे लोक जमा झाले व त्यांनी सुध्दा मंदीरात जावुन मुर्ती बाबत खात्री केली व पोलीसांनी सदर मुर्ती बाबत जमलेल्या लोकांना विचारपूस करून तपास सुरु केला. सदरची कानीफनाथ महाराजांची मुर्ती ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची खात्री झाल्याने सदर चोरट्याने कानफनाथ महाराजांची मुर्ती दुसऱ्यांदा चोरल्याने गावकरी लोकांच्या भावना संतप्त झाल्या. मात्र नंतर कानिफनाथ महाराज यांची मूर्ती चोरीला गेली होती. ती तीन तासातच सापडल्याने जमावाचा संताप कमी झाला. या मूर्तीमध्ये नेमक आहे तरी काय?, सदर मूर्ती दुसऱ्यांदा चोरीस जाण्याचे नेमके कारण काय? असा सवालही परिसरात उपस्थित केला जात आहे.