जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील युवासेना शाखा प्रमुख विनोद जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रेश सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे शिवसेना विभाग प्रमुख नागेश्वर पाटील युवा सेनेचे कार्तिक काळे अक्षय पाटील युवा सेना मिडीया
सेल प्रमुख मुकेश जाधव सागर बेलेकर सरपंच तुळशीराम वाघ रोजगार हमी चे सदस्य अरुण सावकारे हरिभक्त पारायण कन्हैयालाल महाराज हरिभक्त पारायण देवराज महाराज आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात हिवरखेडा तवा चिंचखेडा तवा तसेच वाकोद येथील रवींद्र जोशी भैय्या जोशी सुरेश जोशी परशुराम पारधी या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचा सत्कार शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी शिवबंधन धागा बांधून तसेच भगवा रुमाल घेऊन हार गुच्छ घेऊन सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे यांनी केले तर आभार शिवसेना शाखाप्रमुख मोहन जोशी यांनी मानले याप्रसंगी उपसरपंच अमित तडवी हातिम तडवी गोपाल भोबे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.