चाळीसगाव | चाळीसगावाहून वेगाने जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. याबाबत अज्ञात चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगावाहून भडगावकडे वेगाने जाणाऱ्या छोटा हत्ती या मालवाहू गाडीच्या (क्र. एम.एच.१९ सीवाय ५८२५) धडकेत दुचाकी (क्र.एम.एच.१९ सीएस ४३५६ ) स्वार जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. या अपघातात पितांबर आनंदा पाटील (वय-६३, रा. बोरखेडा, ता. चाळीसगाव) याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनिल दयाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.