जळगाव । माहेरून पैसे आणावे, म्हणून नेहरूनगरातील माहेरवासिनीचा छळ झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री नीलेश मोरे (वय-२९) यांचा विवाह नीलेश सुधाकर मोरे (रा. मुंबई) याच्याशी झाला. काही दिवसानंतर पती नीलेश मोरे याने पैश्यांची मागणी केली. त्यासाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेला सासू, जेठ व जेठाणी यांनी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी घरातून हाकलून दिले.
याबाबत विवाहितेने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यावरून विवाहितेचा पती निलेश सुधाकर मोरे, सासू आशा सुधाकर मोरे, जेठ प्रशांत सुधाकर मोरे, जेठाणी काजल प्रशांत मोरे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहेत.