भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ ते देवळालीच्या दरम्यान मेमू रेल्वे सुरू होण्याची शक्यता असतांनाच आता याच प्रकारातील रेल्वे गाडी भुसावळ ते इगतपुरीच्या दरम्यान धावणार आहे.
मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने बर्याचशा रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी मात्र भुसावळ ते देवळाली पॅसेंजर सुरू न करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. भुसावळ-देवळाली शटल सुरू करण्याऐवजी आता रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी १० जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे.
भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटून इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९.१५ वाजता निघून भुसावळ स्थानकावर ही गाडी सायंकाळी ५.१० वाजता पोहोचेल.