जळगाव, प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाच्या उमेद्वाराविरुद्ध उमेदवारी करणे तसेच पक्षला बदनाम करण्याच्या हेतूने भाजपला सहकार्य करून पक्ष शिस्त भंग केल्याबद्दल जिल्ह्यतील दोन उमेदवारांना व त्यांच्या दोन समर्थकांना प्रदेश काँग्रेस कमिटीने कारणे दाखवा नोटीस पाठविल्याचे वृत्त आहे.
आपणास या प्रकरणी पक्षतून निलंबित का करू नये ? याबद्दल विचारणा करण्यात आली असून सात दिवसाच्या आत स्पष्टीकरण मागितले आहे .
याप्रकरणी प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्षाचे जिल्हा नेते डी. जि. पाटील व त्यांच्या पत्नी अरुणा दिलीप पाटील (उमेदवार) तसेच विकास वाघ(उमेदवार) यांच्या सह जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव रघुनाथ पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बाजविल्याचे वृत्त आहे. याना सात दिवसात या बाबत खुलासा करण्यास सांगितले आहे अन्यथा पक्ष शिस्त भंग केल्याबद्दल पक्षतून निलंबित करण्याच्या कारवाईचा इशारा अधिकृत सूत्रांकडून समजते. याशिवाय उमेदवारांच्या प्रचार पत्रावर प्रकाशक म्हणून नामोल्लेख असलेले अविनाश भालेराव यांनाही लवकरच कारणे दाखवा नोटीस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.