Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»पत्रकारांनी समाजजागृतीसाठी सकारात्मक वृत्तांकन करावे – माजी मंत्री आ.संजय सावकारे
    भुसावळ

    पत्रकारांनी समाजजागृतीसाठी सकारात्मक वृत्तांकन करावे – माजी मंत्री आ.संजय सावकारे

    saimat teamBy saimat teamJanuary 7, 2022Updated:January 7, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी । पत्रकार अन्यायाविरूध्द वाचा फोडतो व त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, म्हणुनच लेखणीत प्रचंड ताकद आहे, तलवारीने जे घडले नाही असा इतिहास लेखणीने घडवला आहे. म्हणून पत्रकारांनी लेखणीचा वापर जपून करावा. आजही जनतेचा इलेक्ट्रॉनिक माध्यमापेक्षा वृत्तपत्राच्या बातमीवर जास्त विश्‍वास आहे. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक वृत्तांकन करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ.संजय सावकारे यांनी केले. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे पं.स. सभागृहात आयोजित सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

    माजी मंत्री आ.सावकारे पुढे म्हणाले की, समाज जागृतीसाठी सकारात्मक विचारांची गरज आहे. अधिक जागरूक राहून जबाबदारीपूर्वक कार्य करा, चांगली पिढी व सक्षम समाज घडविण्यासाठी पत्रकारांचाही सहभाग असल्याचेही त्यानी सांगीतले. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून पाहिला जाणारा पत्रकार न्याय मिळवून देईल ही सामान्य माणसाला अपेक्षा असते. कित्येक पत्रकारांनी अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला त्यांचेही मनापासून कौतुक करतो. असेही ते म्हणाले.

    यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी विलास भटकर, पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सरकारी वकील ॲड नितीन खरे, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी, शहर अध्यक्ष प्रेम परदेशी, भुसावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.तुषार पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, राजु सुर्यवंशी, रमेश मकासरे आदी उपस्थित होते.

    सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार ॲड.नितीन खरे हे गेल्या 32 वर्षांपासून वकीली व्यवसायात आहेत. तसेच 14 वर्षांपासून ते सरकारी वकील म्हणून काम पाहतात. त्यांचे पत्रकारीता, वकीली व्यवसाय व सामाजिक क्षेत्रातील प्रदिर्घ उत्कृष्ट काम लक्षात घेऊन शहर पत्रकार संस्थेतर्फे त्यांना विशेष मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानपत्राचे शब्दांकन डॉ.जगदीश पाटील यांनी केले होते. तर मानपत्र वाचनराजेश पोतदार यांनी केले. यानंतर पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, समाजकार्य पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार, सामाजिक काम करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माजी मंत्री आ.संजय सावकारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रारंभी अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांच्यासह काही पत्रकारांच्या परिवारातील दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली.

    प्रसंगी ॲड.नितीन खरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आपण समाजाचे देणे लागतो, पत्रकारिता निस्वार्थ असावी, ज्या जाहिरातींवर सरकारने निर्बंध घातले अशा जाहिराती टाळाव्या, कोणाचीही हेतुपुरस्कर बदनामी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सत्यता पडताळूनच बातमी द्यावी, आज संस्थेने मानपत्र देवून जो सन्मान दिला त्याबद्दल संस्थेचे त्यांनी आभार मानले. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन यावेळी ॲड. खरे यांनी दिले. प्रसंगी श्रीकांत जोशी, ॲड.तुषार पाटील, ॲड.जास्वंदी भंडारी यांनीही मनोगत व्यक्त केले.

    कोरोना योध्दा म्हणुन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू कोठारी, जेष्ठ नागरिक जी.आर. ठाकूर (मामा), रेल्वेचे राजशिष्टाचार अधिकारी जीवन चौधरी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेशाम लाहोटी, अरूण बैसे, गौसिया नगर यंग गृप, पंचायत समितीचे राजेंद्र फेगडेयांना सन्मानित करण्यात आले.

    उत्कृष्ट पत्रकार म्हणून साईमतचे उपसंपादक राकेश कोल्हे, लोकमतचे वासेफ पटेल, सकाळचे चेतन चौधरी, पुण्यनगरीचे विकास चव्हाण, उर्दू साप्ताहिकाचे सलाउद्दीन आदीब यांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट छायाचित्रकार सुनिल सुर्यवंशी, इम्तियाज शेख, खुशाल नागपूरे, मंगेश जोशी, सद्दाम खाटीक, विशाल सुर्यवंशी, कलिम पायलट, हिरालाल महाजन, विनोद ठाकरे, फिरोज तडवी.

    नारि शक्ती पुरस्कार -प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ.सुवर्णा गाडेकर, डॉ.मधु मानवतकर, डॉ.वंदना वाघचौरे, चिल्ड्रन कॉन्सलर आरती चौधरी, डॉ.मनिषा दावलभक्त, पत्रकार उज्वला बागुल, भारती म्हस्के, राजेश्री सुरवाडे, वाहतुक शाखा महिला कॉन्स्टेबल विजया सपकाळे, राजेश्री नेवे, ऍड.जास्वंदी भंडारी, संगीता भामरे, प्रा.सीमा भारंबे, भारती वैष्णव, डॉ.किर्ती फलटणकर, प्रा.राजेश्री देशमुख, सौ.कविता मेहेरे, ज्योती डिगंबर पाटील. वृत्तपत्र एजंट अमोल साबळे, श्रीकांत कुळकर्णी, अजय वाणी, शिरिष जोशी, रवि निमाणी, सबदर अली, वृत्तपत्र विक्रेता अध्यक्ष दिनेश पखिड्डे. कोरोना योध्दा पत्रकार श्रीकांत सराफ, शाम गोविंदा, आशिष पाटील, गणेश वाघ, वसंत कोलते, अनिल सोनवणे, संजय काशिव, उदय जोशी, अभिजित आढाव, विवेक ओक, राजेश तायडे, राजेश पोतदार, कैलास उपाध्याय, भुषण आंबोडकर, दिपक चांदवाणी, कमलेश चौधरी, कालु शहा, इकबाल खान, वसिम शेख, रमेश खंडारे,निलेश फिरके, संतोष शेलोडे, सुनिल आराक, गोपी म्याँद्रे, सतीश कांबळे, विनोद गोरधे, आकाश ढाके, मयुर निंभोरे, शकिल पटेल, राजू चौधरी, अखिलेश धिमणे, प्रशांत बोरोले, शंतनु गचके, हर्षल पाटील यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रेम परदेशी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.राजेश्री देशमुख, प्रकाश लोडते यांनी केले. यशस्वीतेसाठी शहर पत्रकार संस्थेचे उपाध्यक्ष आशिष पाटील, गणेश वाघ, सचिव हबीब चव्हाण, कोषाध्यक्ष उज्वला बागुल, सहसचिव राजेश तायडे, राकेश कोल्हे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ न्यायालयाबाहेर महिलेकडून गावठी कट्टा जप्त

    January 15, 2026

    Bhusawal:भुसावळ शहरात पार्किंग वादामुळे वाहतुकीला धक्का

    January 9, 2026

    Bhusawal:गजबजलेल्या बसस्थानक परिसरात धावत्या कारने घेतला अचानक पेट

    January 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.