जामनेर, प्रतिनिधी । भारतीय भटके विमुक्त आदिवासी व ओबीसी संघर्ष महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुकाध्यक्ष तुकाराम सखाराम काळे (गोपाळ) यांच्या हस्ते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या कार्यकारिणी ठिकाणी जामनेर तालुका उपाध्यक्ष उस्मान शेख,सांडू तडवी,शहराध्यक्ष अमोल लोहार ,उपशहराध्यक्ष ज्ञानेश्वर ताटे,शहर सचिव अतुल महाजन,गोविंद लोहार,पत्रकार गणेश पांढरे,कडू नवघरे,प्रविण ठाकरे,उपस्थित राहून सर्व पदाधिकारी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांची जंयती साजरी केली व त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
तसेच यादिवशी पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या वतीने देण्यात आल्या.