जळगाव : प्रतिनिधी
उपमहापौर सुनिल खडके यांच्या प्रेरणेने आज शहरात आयोजित केलेल्या सायक्लोथॉन रॅलीमध्ये २०० सायकलपटूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या सर्व सायकलपटूंनी नियोजित १० कि.मी.चे अंतर पूर्ण केल्यामुळे सर्वांचा महापौर भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
जनतेमध्ये सायकलींगची आवड निर्माण व्हावी व वाढावी या उद्देशाने उपमहापौर सुनिल खडके यांच्या प्रेरणेने सायक्लोथॉन (सायकल फेरी) आयोजित करण्यात आली. तिचा प्रारंभ आज सकाळी ७ वाजता शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉफ येथून महापौर भारतीताई सोनवणे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. या सायकल फेरीचा मार्ग कोर्ट चौक, स्टेडीयम चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौफुली, काव्य रत्नावली चौक, डी मार्ट मार्गे मोहाडी रोडने लांडोरखोरी उद्यान व उलट त्याच मार्गाने परत गोविंदा रिक्षा स्टॉप असा होता. २०० हून अधिक सायकल पटूंनी उत्साहाने या फेरीत सहभाग घेतला. विविध मान्यवर देखील सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले होते.
या सायकल फेरीच्या सुरूवातीस महापौर भारतीताई सोनवणे यांच्यासह उपमहापौर सुनिल खडके, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, नगरसेवक कैलासअप्पा सोनवणे, मनोज उर्फ पिंटू काळे, भाजपा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, कुंदन काळे, चंदन महाजन, समीर रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सर्व सायकलपटूंनी १० कि.मी.चे अंतर पूर्ण केल्यामुळे त्यांचा प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला. या सायकल फेरीचे अंतर डांभुर्णींचा निलेश कोळी व जळगावचा संभाजी पाटीलने सर्वप्रथम पूर्ण केल्यामुळे उपमहापौर सुनिल खडके यांनी त्यांना शाबासकी दिली.