जळगाव । तालुक्याक्यामधील खेडी बुद्रुक परिसरातील वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरचालकाविरुद्ध महसूल विभागाने कारवाई केली. याबाबत डंपरचालकाविरुद्व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खेडी बुद्रुक परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार राहूल वाघ यांनी मिळाली. मंगळवारी रात्री ११ वाजता महसूल पथक गस्तीवर असतना खेडी बुद्रुक परिसरात डंपर (क्र .एमएच १९ बीएम ४४४३) ने वाळू वाहतूक होताना आढळले. याबाबत नायब तहसीलदार राहूल वाघ यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक ज्ञानेश्वर प्रल्हाद कोळी यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झा ला आहे. तपास नाईक दिनेश पाटील करीत आहे.