मोबाईल व आधारक्रमांक सिडींगसाठी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे आवाहन

0
15

जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील समस्त प्राधान्य लाभार्थी व अंत्योदय कार्डधारकांनी आपल्या संबंधीत रेशन दुकानावर जावून आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच आपल्या वार्षिक उत्पन्नाबाबत हमीपत्र भरुन देणे सुध्दा आवश्यक आहे. जळगाव जिल्हा सरकारमान्य रेशन दुकानदार संघटना मर्यादित, जळगाव यांनी लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील समस्त कार्डधारकांनी आपल्या संबंधीत रेशन दुकानाजवळ आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्यावे व आपल्या वार्षिक उत्पन्नाबाबत हमीपत्र भरुन देण्याचे करावे.सदर हमीपत्र संबंधित रेशन दुकानदाराजवळ उपलब्ध असल्याचेही म्हटले आहे.
तसेच एपीएल,केशरी आर.सी.१२ अंकी नंबर नसलेल्या कार्डधारकांसाठी माहे जुलै, ऑगस्ट २०२० करीता महाराष्ट्र शासनाकडून गहु, तांदुळ रेशन दुकानांवर उपलब्ध होत आहे.
प्रती माणसी गहू ३ किलो, भाव ८ रुपये, तांदूळ २ किलो, भाव १२ रुपये याप्रमाणे धान्याचे वाटप करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसिलदार जळगाव यांचेकडून रेशन दुकानदारांना देण्यात आले आहेत. तरी गरजू कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जळगाव जिल्हा सरकारमान्य रेशन दुकानदार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष जमनादास भाटीया, उपाध्यक्ष शुभांगी बिर्‍हाडे, कार्याध्यक्ष सुनिल जावळे, सचिव प्रशांत भावसार, खजिनदार व्ही.बी.खान आणि कार्यकारिणीने पत्रकाव्दारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here