जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी – जिल्हाधिकारी

0
15

जळगाव प्रतिनिधी – “नायलॉन मांजाची निर्मिती, आयात, विक्री, साठवणूक व वापर करण्यास जळगाव जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली असल्याने या मांजाची खरेदी, विक्री करू नये” अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

“मकर संक्रांत व इतर सणांच्या वेळेस पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्या धाग्याची निर्मिती, आयात करणे, विक्री, साठवणूक व वापर करण्यास जळगाव जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली असल्याने या मांजाची खरेदी, विक्री करू नये” अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, “पक्ष्यांना प्राणघातक ठरणारा मांजा पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनाने बंदी घातली आहे. त्याची विक्री करणे, साठविणे व वापरणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. अशा व्यक्ती अथवा व्यापाऱ्यांविरुध्द कारवाईची मोहीम वन विभागातर्फे उघण्यात आली आहे.”

“सदर नायलॉन मांज्याची खरेदी, विक्री करू नये. जळगाव जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी/ किरकोळ व्यापारी/ साठवणुकदारांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व स्थानिक संस्था व पोलिस विभागाने स्वतंत्ररीत्या पथके तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती संस्थेने उल्लंघन केल्यास ही बाब ही पर्यावरण ( संरक्षण) अधिनियमान्वये शिक्षेस पात्र राहील” असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here