डिसेंबर महिन्यातील तापमानाचा नोंदीचा अहवाल तत्काळ सादर करा

0
18

जळगाव, प्रतिनिधी । केळी या पीकाला जास्त तापमान व तापमानात जास्त घट झाली तरी मोठ्या प्रमाणात फटका बसत असतो. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. हवामानावर आधारीत फळपीक विम्याचा नवीन निकषानुसार तापमानाचा पारा सलग तीन दिवस ८ अंशापर्यंत खाली गेला तर विमाधारक शेतकरी विम्यासाठी पात्र ठरत असतो. डिसेंबर महिन्यात १७ ते २० डिसेंबर दरम्यान जळगाव शहर परिसराचा पारा सलग काही दिवस ८ अंशापर्यंत स्थिर होता. त्यामुळे याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचा सूचना पालकमंत्री गुलबराव पाटील यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.

फळपीक विमा योजनेबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील काही केळी उत्पादक शेतकरी देखील उपस्थित होते. २०२१-२०२२ या हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ४५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. गेल्या वर्षी या योजनेच्या जाचक निकषांमुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ भेटला नव्हता. जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळापैकी केवळ ३ मंडळे यासाठी पात्र ठरले होते. मात्र, राज्य शासनाने निकषांमध्ये बदल केल्यामुळे आता पुर्वीप्रमाणे निकष कायम झाले आहेत. त्यामुळे निकषांचा अभ्यास करून तापमानाचा नोंदी सातत्याने घेण्यात याव्यात अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.

नुकसान झालेला एकही शेतकरी विम्यापासून वंचित राहता कामा नये
सलग तीन दिवस तापमानाचा पारा ८ अंशावर राहिल्यास विमाधारक शेतकरी हे विम्यासाठी पात्र ठरतात. त्यामुळे पिंप्राळा महसुल मंडळासह भोकर महसुल मंडळातील डिसेंबर महिन्यातील तापमानाच्या नोंदी घेवून आपला अहवाल तयार करण्याचा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. गेल्या बदललेल्या निकषांमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर देखील अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहिले होते. मात्र, यावर्षी नुकसान झालेल्या एकही केळी उत्पादक शेतकरी विम्याचा रक्कमेपासून वंचित राहता कामा नये अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कृषी विभागाने आपला अहवाल सादर करून, विम्या कंपन्यांना देखील तापमानाच्या नोंदी देण्याचा सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here