पारोळा, प्रतिनिधी । गुजरात राज्यातील दिंडोरी येथील अट्टल गुन्हेगार कैलास आधार पाटील राहणार महादेव नगर दिंडोली सुरत गुजरात हा जळगाव जिल्ह्यात लपुन बसल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे मिळाल्याने त्यांनी त्यांच्या शोध घेत त्याला जेरबंद केले.
स्पेशल ऑपरेशन ग्रुप सुरत सिटी गुजरात यांनी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्याशी संपर्क साधुन जळगाव जिल्ह्यात कैलास आधार पाटील हा लपुन बसल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ. अशोक महाजन, पोह. संदीप रमेश पाटील, पोना. प्रवीण मंडोले, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील असे पथक नेमून त्यांना आदेश दिले.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदर आरोपी कैलास पाटील हा पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथे जंगलात लपून बसला असल्याचे समजले. तसेच वर नमूद पथकातील पोलीस अमंलदार सदर आरोपी रात्री अमळनेर येथे आपल्या प्रेयसीला भेटण्याकरिता जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पथकातील कर्मचारी व स्पेशल ऑपरेशन गृप सुरत सिटी गुजरात यांनी संयुक्तरीत्या पारोळा मंगरूळ रस्त्यावर सापळा रचून सदर आरोपी जेरबंद केले.
सदर आरोपीवर गुजरात राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील कारवाईसाठी सदर गुन्हेगारास स्पेशल ऑपरेशन सुरत सिटी गुजरात यांच्या ताब्यात दिले. पुढील कारवाई स्पेशल ऑपरेशन सुरत सिटी गुजरात हे करीत आहेत.