यावल, प्रतिनिधी । राजकारणात समाजात आता काही ठिकाणी आपले विशिष्ट वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी कोण काय शक्कल लढविली हे आता सांगता येणे कठीण झाले आहे.काही धूर्त व्यवहारी हे शासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून किंवा नाम मात्र मानधनावर कामकाज करून आणि काही ठराविक मध्यस्थी दलाली करीत असून काही ठिकाणी रक्ताचे नातेसंबंधातील सदस्य आपल्या आर्थिक बळावर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून अधिकारी कर्मचारी व सामाजिक क्षेत्रात आपला प्रभाव टाकीत असतात आणि याकडे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे एक उदाहरण यावल शहरात उघडकीस आले आहे,गुप्त खबर मिळाल्या वरून तसेच यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच यावल पोलीस स्टेशनला तत्कालीन स्वीपर म्हणून काम करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणांकडून गावठी पिस्तूल,1 जिवंत काडतूस, 2 मोबाईल आणि एक मोटरसायकल असा एकूण अंदाजे दीड ते दोन लाखाचा मुद्देमाल यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पथकाने जप्त करून आरोपीस अटक केली आहे.हा गुन्ह्या उघडकीस आल्यामुळे शहरातील सर्वस्तरीय समाजातील दादागिरी आणि राजकीय प्रभाव टाकणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांची सुद्धा एका घटनेत एका स्वीपरने परस्पर फार मोठी आर्थिक थोडी पाणी करून धनवडे साहेबांना अडचणीत आणले होते आणि आहे हे सर्वांना ज्ञात आहे.
शहरातील एका तरुणाकडे गावठी पिस्तूल असल्याची गोपनीय खबर/माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार यावल पोलिसांनी काल रविवार दि. 2 जानेवारी2022 रोजी संध्याकाळी यावल येथे यावल फैजपूर रोडवर हॉटेल अंजली समोरुन सुमित युवराज घारू वय 21 राहणार (श्रीरामनगर) यावल यास गावठी पिस्तूल जिवंत काडतूस दोन मोबाईल आणि मोटरसायकल सह ताब्यात घेतले. त्याच्याजवळ सापडलेली दुचाकी ही चोरीची आहे किंवा इतर अनधिकृत व्यवहारातील आहे याबाबतची चौकशी केली जाणार असल्याने तसेच यासंदर्भात तालुक्यातील कोणाच्या काही तक्रारी आल्यास फार मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून असून आरोपीविरुद्ध आर्मऍक्ट अन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान,सुशील घुगे,नेताजी वंजारी,हे.कॉ.असलम खान, भूषण चव्हाण,रोहील गणेश, निलेश वाघ,राहुल चौधरी, जगन्नाथ पाटील या पोलिस पथकाने यशस्वीरित्या सापळा रचून ही कारवाई केली आहे.